२३ डिसेंबर १९७३ रोजी एका छोट्या जागेत सुरु झालेल्या बँकेच्या रोपट्याचे सादेतील दशकांच्या अल्प कालावाधीतच वृक्षात रुपांतर होत आहे. आजमितीस बँकेचे ३२००० हून अधिक भागधारक असून सुमारे २.२५ लाखांच्या वर ग्राहक आहेत आणि बँकेचा एकूण बिझनेस रु. १९०० कोटींच्या वर आहे. खऱ्या अर्थाने लोकांची ‘जनता' बँक होण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी व्यवस्थापन व कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात.
१९७० साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अॅड. भाऊराव सबनीस व श्री. वसंतराव पुरोहित यांनी कल्याणमधील मध्यमवर्गीय लोकांसाठी बँक स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी कल्याणातील “दि कल्याण पीपल्स को. ऑप. बँक" बुडीत खाती निघाली होती. कल्याणातील नागरिक असंतुष्ट होते. या पार्श्वभूमीवर बँकेसाठी भागभांडवल गोळा करणे हे एक खडतर आव्हानच होते. परंतु त्याचा निश्चय आणि सर्व संस्थापकांच्या अथक प्रयात्नांचे फळ म्हणजेच दि. २३ डिसेंबर १९७३ रोजी झालेली बँकेची स्थापना. सुमारे १८०. चौ. फुटाच्या छोट्याच्या जागेत ३ कर्मचाऱ्यांच्या साथीने रु. ५०,०००/- भागभांडवल व रु. ८०,०००/- च्या ठेवींच्या मदतीने बँक सुरु झाली.
बँकेच्या पहिल्या संचालक मंडळावर की. श्री. भगवानराव जोशी, डॉ. पद्माकर कारखानीस, अॅड. श्री. भाऊराव सबनीस, चार्टर्ड अकाउंटेंट श्री. वसंतराव फडके, प्राचार्य श्री. अशोक प्रधान, श्री. एस.एम. ओक, अॅड. श्री. उमर शेख, श्री. नारायण भोईर, श्री. गंगाराम कदम, श्री. वसंतराव पुरोहित, श्री. वामनराव साठे हे संचालक होते. ह्या संचालकांचा दुर्दम्य ध्येयवाद व उत्साह यामुळे बँकेने लवकरच कल्याण शहरात गरुड झेप घेतली व आर्थिक प्रगतीसाठी नवी क्षेत्रे शोधण्यास सुरुवात केली. बँकेच्या कल्याणमध्ये ९ शाखा व कल्याणबाहेर उल्हासनगर, वाडा व मुरबाड येथे शाखा उघडल्या. २००४ साली मुंबई शहरात प्रवेश करताना बँकेने घाटकोपर येथे शाखा उघडली.
विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आणि निरनिराळ्या सामाजिक संथांना मदत करून बँकेने रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे केले. बँकेच्या इतिहासातील हे एक अविस्मरणीय वर्ष आहे. ‘वनवासी' लोककल्याणासाठी ज्यांनी आपले आयुष्य वाहिले अशा श्री. रामभाऊ ताम्हाणे यांचा सत्कार करून रौप महोत्सवी वर्षाची सुरुवात झाली. की. प्रमोद महाजन यांच्या हस्ते श्री. ताम्हाणे यांना ‘संचालक पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
मध्य प्रदेशचे राज्यपाल मा. श्री. भाई महावीर यांनी रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. श्री. महावीर यांचे हस्ते श्री. सुरेंद्र वाजपेयी यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल ‘संचालक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. याचबरोबर ओक बाग येथील मैदानात तीन दिवस संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध बासरीवादक मा. श्री. हरिप्रसादजी चौरसिया यांनी आपल्या मधुर बासरीने वातावरण मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या दिवशी अमेरिकास्थित भारतीय कलाकारांनी डॉ. सौ. मीना नेरुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वसुंधरा' या संगीत नाटकाचा आस्वाद चाहत्यांना दिला. तिसऱ्या दिवशी ‘अनिल मोहिले रजनी' मध्ये सुप्रसिद्ध संगीतकार श्री. अनिल मोहिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी रसिकांना जी संगीताची मेजवानी दिली तो अनुभव केवळ अविस्मरणीय आहे.
बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कल्याणमधील प्रमुख मार्गावरून सिंडीकेट शाखा ते मुख्य शाखा अशा सहकार दिंडीचे आयोजन केले होते. ह्या दिंडीची सांगता टिळक चौकात जिथे बँकेची स्थापना झाली होती तेथे झाली. त्याप्रसंगी बँकेचे माजी संस्थापक अध्यक्ष कै. श्री. भगवानराव जोशी व इतर संचालक यांनी बँकेच्या जुन्या जागेतून ‘सहकार ज्योत' प्रज्वलित करून ती नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या नेतृत्वाच्या हाती सुपूर्त केली. त्या ठिकाणी बँकेचे आजी माजी संचालक, खातेदार, भागधारक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बँकिंग क्षेत्रातील बदल व नवे तंत्रज्ञान या बाबतच्या माहितीसाठी संचालक व कोकण नागरी बँक्स असोसियेशनच्या सभासदांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी दिनाचे औचित्य साधून दि. १४ ऑगस्ट १९९७ रोजी सर्व शाखा रात्री १२.०० वाजेपर्यंत चालू ठेवून ठेवी गोळा करावयासाठी एक अगला प्रयत्न केला गेला आणि त्यास जनतेने मनापासून उत्तम प्रतिसाद दिला. दोन तासात बँकेने सुमारे रु. १.२५ कोटींच्या ठेवी गोळा केल्या. रात्री १२.०० वाजता स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन करून राष्ट्रप्रेमाची पावती दिली. त्यास कल्याणकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
३ ऑक्टोबर २००९ रोजी दि सातारा मर्चंट्स को. ऑप. बँकेचे आपल्या बँकेत विलीनीकरण झाले. त्यामुळे बँकेला अजून ४ शाखांमार्फत सातारा व परिसरातील ग्राहकांना ग्राहकसेवा देवे साध्य झाले. २००९-१० मध्ये बँकेच्या आणखी नवीन शाखा सुरु झाल्या. उल्हासनगर-२ आणि ठाणे येथे बँकेच्या शाखा उघडण्यात आल्या. तसेच कराड व चिंचवड शहरांतही बेंकेने शाखा उघडल्या आहेत. बँकेच्या सर्व शाखा ‘कोअर् बँकिंग प्रणाली (CBS)’ खाली ग्राहकांना तत्पर सेवा देत आहेत.
NEFT (National Electronic Fund Transfer) व RTGS ची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे कि ज्यायोगे ग्राहकांना एका बँकेतून दुसऱ्या बँकेत Funds Transfer करणे सोपे झाले आहे. दिनांक ०१.०५.२००९ - महाराष्ट्र दिनापासून SMS बँकिंगसेवा ग्राहकांसाठी सुरु करण्यात आली आहे. टेलीफोन बिलासाठी ECS ची सुविधा ग्राहकांना नि:शुल्क पुरविली जाते.
जनतेच्या सोयीसाठी बँकेच्या बहुतांश शाखा सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रांत कार्यरत असतात. तसेच, ग्राहकांच्या सेवेत रविवारी सकाळीदेखील बँक चालू असते. गवर्नमेंट सेक्युरिटीसमधील व्यवहारासाठी बँकेला ‘Negotiated Dealing System’ ची मेंबरशीप मिळाली आहे. NRI लोकांकडून Rupee Deposit घेण्यासाठी आवश्यक असलेला ‘Authorised Co-Operative Bank’ हा दर्जा रिझर्व बँकेने आपल्या बँकेस दिला आहे. बँकेच्या १५ शाखांमध्ये हि सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकारने Stamp Vending License बेन्केस दिले असून काळातलाव शाखेमार्फत फ्रँकिंग सेवा ग्राहकांना पुरविण्यात येते.
सुरुवातीपासूनच दरवर्षी बँकेच्या व्यवसायात व नफ्यात वाढ होत आहे. Capital Adequacy, Profitability, Net NPA, CRR आणि SLR याबाबतचे निकष बँक दरवर्षी पूर्ण करत आहे आणि त्यामुळेच दरवर्षी रिझर्व बँकेकडून बँकेला चांगला दर्जा मिळत आहे. दिनांक ३१.०३.२०११ रोजी संपलेले आर्थिक वर्षाची त्यास अपवाद नाही. गेली ३७ वर्षे बँकेला ऑडिटमध्ये सतत A वर्ग मिळत आहे. दि. ३१.०३.२०११ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीही बँकेस अ वर्ग प्राप्त झाला आहे. दि. ३१.०३.२०११ रोजी बँकेचे Net NPA ०%, Gross NPA ४.०७%, CRAR १३.१२% असून बँकेच्या मजबूत स्थितीचे हे द्योतक आहे. ऑगस्ट २००३ मध्ये महाराष्ट्र कालानिकेतनतर्फे मिळालेला Best Urban Co-Operative Bank पुरस्कार बँकेस नक्कीच अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील इतर ६५८ को. ऑप. बँकांमधून आपल्या बँकेस मिळालेला हा पुरस्कार ही बँकेच्या इतिहासातील महत्वाची घटना आहे.
मुदत ठेवींवर बँक आकर्षक व्याजदर तर देतेच पण हे दर इतर व्यापारी बँकांच्या व्याजदरापेक्षा थोडे जास्त असतात. याशिवाय, रिजिस्टर्ड सहकारी संस्था आणि ज्येष्ठ नागरिक यांना ०.५% p.a. अधिक व्याजदर दिला जातो. बँकेने ‘कल्याण तिमाही व्याज योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर दिला जातो. तसेच, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्यटन कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यवसायासाठी कर्ज अशा कितीतरी कर्ज योजना बँकेने ग्राहकांसाठी चालू केल्या आहेत. प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याप्रकारचे कर्ज बँक योग्य व्याजदराने व ठराविक मुदतीकरिता उपलब्ध करून देते. व्यवसायवृद्धीसाठी तसेच जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी बँकेने आतापर्यंत १२००० च्या वर खातेदारांना कर्जवाटप केले आहे.
अगदी सुरुवातीपासूनच बँकेचे संचालक कुठल्याही प्रकारचे कर्ज घेत नाहीत. रिझर्व बँकेने याबाबतीत जरी आता परिपत्रक काढले असले तरी बँक सुरुवातीपासूनच त्याची अंमलबजावणी करीत आहेत. तसेच संचालक कुठल्याही प्रकारचा सभा भत्ता घेत नाहीत. ती रक्कम ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ या नावाने जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्यात जमा करतात व त्यातून, ठाणे जिल्ह्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस ‘संचालक पुरस्कार' वितरित करतात. आतापर्यंत हा पुरस्कार श्र ी नानासाहेब करंदीकर, कै. भगवानराव जोशी, कै. वि.आ.बुवा, श्री. नानासाहेब फडके, श्री. सदाशिवराव साठे, श्री. रामभाऊ ताम्हाणे, श्री. सुरेंद्र वाजपेयी, श्री. रामभाऊ कापसे, श्री. दत्तात्रेय म्हैसकर, श्री.जयकुमार पाठारे, श्री. वामनराव प्रभुदेसाई ह्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे. कल्याणमधील आय हॉस्पिटल - धर्मार्थ डोळ्यांचा दवाखाना संस्थेस मागील वर्षी संस्थेच्या वतीने रु. ५०,०००/- रकमेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी बँकिंग व्यवहारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाखेस ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार' ही या निधीतून देण्यात येतो. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर, उत्कृष शाखेस मानपत्र व रोख पुरस्कार देण्यात येतो.
सामाजिक बंधीकालीची जाणीव लक्षात ठेवूनच गेली साडे तीन दशक बँक विविध सामाजिक, शैक्षणिक, कला, वैद्यकीय, क्रीडा इ. क्षेत्रातील संस्थांना आर्थिक मदत करीत आहे. आतापर्यंत सुमारे २५० संस्थांना रु. ५० लाखांपर्यंत निधीचे वाटप केले आहे. कल्याणमध्ये कै. रामभाऊ म्हाळगी साग=भागृह, महिला उद्योग मंदिर येथे, जनता बँक कक्ष तसेच आंभान, तालुका पालघर येथे कै. दामुअण्णा टोकेकर आदिवासी सभागृह उभारण्यासाठी बँकेने आर्थिक मदत केली आहे.
दरवर्षी सभासद कल्याण निधी मधून १०वी, १२वी व स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात येतो. तसेच या निधीतून सर्व महिला सभासद व ६५ वर्षांवरील पुरुष सभासद यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येते व वैद्यकीय उपचारांसाठीही आर्थिक मदत केली जाते.
कर्मचारी कल्याण निधीमधून कर्मचाऱ्यांसाठी व्याख्याने, क्रीडा, स्नेहसंमेलने, इ. कार्यक्रम केले जातात. स्नेहसंमेलनात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, २५ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार इ. कार्यक्रम होतात. सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यात सहभागी होतात.
पर्यावरण व प्रदूषण याबाबतच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनात खारीचा वाट उचलावा या हेतूने बँकेने टिटवाळयाजवळ म्हस्कळ येथे २०,००० वृक्षारोपण प्रकल्प हाती घेतला आहे. ‘सहकारी वनीकरण' या नावाने हा प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे भारत सहकारी बँक तसेच Mahindra Lifespaces व Johnson & Johnson ह्या कंपन्यांनी सहकार्य दिले आहे. १०,००० झाडे लावण्याचा संकल्प बँकेने २०११ मध्ये पूर्ण केला आहे.
यावरून एक गोष्ट लक्षात येते, कि बकेची झालेली प्रगती के लायंकर जनतेचे प्रेम व विश्वास याचे सामुहिक यश आहे. संचालकांचे कल्पक नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांची मेहनत, चिकाटी, हुशारी आणि प्रामाणीकपणा तसेच तत्पर व आपुलकी वाटावी अशी ग्राहकसेवा यांतच बँकेच्या यशाचे गमक आहे.
आपल्या खात्यातील बाकी जाणण्यास SBAL असा एस.एम.एस. 09223051595 या क्रमांकावर करा.
इतक्यातील ३ व्यवहार जाणण्यास LST3 असा एस.एम.एस. करा.
Disclaimer: This website has been designed by the bank with copyrights. By accessing this website you acknowledge that you are seeking information on your own accord. While every attempt is made to ensure that the contents are updated, however, no legal action can be initiated against the bank or any of its officers/staff directly/indirectly for any reason on the contents/display of the website. The visitors are advised to contact the nearest branch for getting updated and accurate information about any product or service of the Bank. The terms and conditions for various products and data and content displayed are subject to change without any prior notice. Terms and conditions are applicable to each of the product on display. This website is for information purpose only.
Obviously best viewed in Mozilla Firefox and in screen resolution 1024 X 768 and above.

