मुख्पृस्थाकडे

असे घडले सहकारी वनीकरण !

दि. १० ऑगस्ट २००४: 'कल्याण नागरिक' या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली बातमी : मध्या वैतरणा योजना कर्यान्वयीत करण्याकरीता वनखात्याची १५०० एकर जमीन उपयोगात आणली जाणार होती वा या ठिकाणी नष्ट होणारे वृक्ष बीड जिल्ह्यात लावण्याचे राज्या सरकारने मान्य केले.

दि. २५ ऑगस्ट २००४: कल्याणातील जेष्ठ, सुजाण नागरीक वा दि. कल्याण जनता सहकारी बेंकेचे तत्कालीन संचालक यांचा प्रतिसाद. बीड जिल्ह्यात वृक्ष लावण्या ऐवजी ठाणे जिल्ह्यातील सहकारी बॅंका, शिक्षण संस्था व एन्या सामाजिक संस्थाना वमनखात्याने जमिनी दिल्यास या संस्था वृक्षरोपणाचे काम करू शकतात असा विश्वास श्री. साठे यांनी 'कल्याण नागरिक' मध्ये एका लेखाद्वारे व्यक्त केला व या लेखाची प्रत 'वनराई' चे श्री. मोहन धारिया याना पाठवली.

दि. २९ ऑगस्ट २००४: श्री साठे केवळ सूचना करून थांबले नाहीत तर तयांनी या संबंधी एक योजना POT मुख्य वनसंरक्षक, श्री आस्थाना यांच्याकडे पाठवली. हे POT काय प्रकरण आहे? BOT माहीत आहे पण हा POT काय प्रकार आहे? Build Operate and Transfer(BOT) ही संकल्पाना समाजाने स्वीकारली आहे पण POT म्हणजे काय? योजनेत स्पष्टीकरण आहे- plant,operate and transfer - झाडे लावा, वाढवा, व शासनाकडे परत करा. वनखात्याची वनसंवर्धानाकरिता एक योजना आहे. या योजनेअंतर्गत खाजगी कंपन्याना वानखात्याने जमीन भाडेकराराने द्यावयाची व त्या खाजगी कंपनीने एखाद्या वनीकरणातील तद्न्यच्या NGO च्या माध्यमातून वनीकरण प्रकल्प राबवायचा. श्री साठे यांनी अशी सूचना केले की नागरी सहकारी बँकांनासुद्धा ही योजना लागू करावी. त्याकरिता सहकारी बँकानी त्यांच्या फायद्यातून योजना कार्यन्वयीत करावी. सहकार खाते सर्व सहकारी नागरी बँकांना त्यांच्या फायद्यातून १% रक्कम धर्मादाया करीता खर्च करण्यास अनुमती देते. त्याप्रमाणे वनीकराणाकरीता अशी काही रक्कम काढण्यास सहकारी खात्याने अनुमती द्यावी असा त्यांचा आग्रह. साठे साहेबांनी एखादा विषय लावून ठेवण्याचे ठरवले की ते सर्व बाजूंनी रान उठवतात. वानखात्याचे अधिकारी, शासकीय अधिकारी, सचिवालाय, आमदार, खासदार, मंत्री, सहकारी बँकांच्या संघटंना या सर्व माध्यमाण्तुन पाठपुरावा. काही ठिकाणी या विषयास प्रतिसाद, तर काही ठिकाणे काहीच हालचाल नाही.

दि. ८ डिसेंबर २००५: आणखी एका व्यक्तीने हा विषय मार्गी लावण्याचे ठरवले. त्या व्यक्तीला हा विषय चांगलाच भावला. स्थळ: महाराष्ट्र राज्यविधानपरिषदेचे सभागृह डॉ. अशोकराव मोडकांनी या विषयाकरीता अर्धा तास चर्चा उपस्थित केली. अशोकरावांच्या योग्य व भावपूर्ण मांडणीने सभागृहाने हा विषय उचलून धरला. शासकीय पातळीवर हा विषय मान्यता पावला. सभागृहातील सर्व सभासद व मा. वनमंत्री यांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात वणांचे प्रमाण २१% आहे व निसर्गाला वाचवायचे असेल तर सण २०१२ पर्यंत हे प्रमाण ३३% असले पाहिजे असे प्रा.वनमंत्री बबनराव पाचपूते यांनी सांगितले. तसेच प्रत्येक योजनेतील ७ वर्षांचा भाडेकरांचा कालावधी अपुरा असून तो किमान २० वर्षांचा करावा असा शासकीय प्रस्ताव केन्द्र शासनाकडे पाठवण्यात येईल असे त्यांनी सभागृहाला सांगितले.

दि. २३ फेब्रुवारी २००६: ठाणे जिल्ह्यातील पारसिक जनता सहकारी बँकेने अनौपचारिकरित्या वनीकरणचा उपक्रम कळव्याजवलील डोंगरावर यशस्वीपणे राबविला होता. वानखात्याच्या तत्कालीन सचिव सौ. नीलाताई सत्यनारायण यांनी या प्रकल्पाला भेट दिली होती व त्या बद्दल समाधान व्यक्त केले होते. अशोकराव विध्ांपरिषदेत विषय मांडून थांबले नाहीत. त्यांनी नीलाताईची भेट ठरवली. नीलाताईंच्या कार्यालयात डॉ. मोदक, श्री साठे तसेच ठाणे भारत सहकारी बॅंकेचे अध्यक्ष श्री मा. य गोखले, उपाध्यक्ष श्री. उत्तमराव जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकल्प सहकारी बँकानी राबवण्याचे निश्यित झाले. शासनाने जमीन भाडेकराराने द्यायची, सहकारी बँकानी पैसा खर्च करावयाचा व एखाद्या स्वयंसेवी संस्थेने हा प्रकल्प कार्यान्वयीत करावयाचा अशी एकूण रचना ठरली. वनखात्याच्या अधिकर्‍यनच्या सहकर्याने जागेचा शोध सुरू झाला. चार पाच एकर जागा पाहिल्यावर तित्वल्याजव मौजे म्हस्कळ येथील काळू नदीच्या किनर्यावरील जागा सगळ्याना अतिशय आवडली व तीच जागा प्रकल्पासाठी घेण्याचे ठरले. मध्यंतरी तत्कालीन सहकार मंत्री मा. श्री. पतंगराव कदम यांनी सहकारी बॅंकना त्यांच्या नफ्यातून २% रक्कम वनीकरणा करीता खर्च करण्यास अनुमती दिली.

दि. १७ मे २००७: दोन त्रिपक्षीय करार संपन्न. ठाणे येथे दि कल्याण जनता सहकारी बॅंक लि., वनखाते व संचालक समाजसेवा पुरस्कार निधी ट्रस्ट(स्वयंसेवी संस्था) यांधे सहकारातून वनीकरण या त्रिपक्षीय करार संपन्न झाला व असाच एक करार ठाणे भारत सहकारी बँकेबरोबर करण्यात आला. या करारन्वये प्रत्येक बेंकेस टिटवाळ्याजवळील मौजे म्हसकळ येथील काळू नदीच्या किनर्‍याजावळील १० हेक्टर म्हणजे २५ एकर जागा सात वर्षांच्या भाडेकराराने देण्यात आली. संचालक समाजसेवा पुरस्कार निधी या स्वयंसेवी संस्थेने हा प्रकल्प कार्यान्वयीत करावायावचे ठरले. या प्रसंगी मा. बबनराव पाचापुते,सचिव सौ. नीलताई सत्यनारायण, माजी आमदार डॉ. अशोकरव मोदक, आ. श्री संजय केळकर, आ. श्री गोत्ीराम पवार, दोन्ही बँकांचे तत्कालीन अध्यक्ष, वानखात्याचे अधिकारी व या प्रकल्पाचे सूत्रधार श्री. वामनराव साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

दि १ जुलै २००७: त्रिपक्षीय करार झाल्यानंतर वेळ फारच कमी होता व२००७ च्या पावसाळ्यात सुरवात तर होणे आवश्यक होते. अर्थात नियोजनाशिवाय प्रकल्प करणे युक्त नावते. म्हणून त्रिपक्षीय करार झाल्यानंतर माजी वनाधीकारी श्री. अनिल ठाकरे यांची पराएअल्पाचे सल्लागार म्हणून दि २७ मे २००७ रोजी नेमणूक झाली. त्यांनी सात वर्षातील ५० एकर जागेवारील वृक्षांची लागवड करण्याचा आराखडा तयार करण्याचे योजले. पूर्ण तपशीलवार आराखडा सहा महिन्यात करण्याचे ठरले व सुरुवातीस प्रत्येक बँकेकरीता ५०० अशी एकूण १००० रोपे २००७ मध्ये लावण्याचे ठरले आणि १ जुलै २००७ चा मुहूर्त ठरवीला. टिटवाळ्याच्या मंदिरात दोन्ही बँकांच्या अध्यक्षांनी महागणपतीची पूजा केली. तसेच जागेवर शंकर महाराज, म्हासोबा इ. पूजा करण्यात आल्या. त्या दिवशी वरुणराजाने जोरदार वृष्टी करून आशीर्वाद दिले. वृक्षारोपणासाठी केलेले खड्डे पाण्याने भरले होते. परंतु लोंकाचा उत्साह अदम्य होता. कदाचीत पर्जन्यवृष्टीमुळे तो द्विगुणीत झाला. जवळ जवळ ५०-६० लोंकाच्या उपस्थीतीत सुमारे ७५ रोपांची लागवड करून या प्रकल्पाची महुर्टमेढ रचली. दि १५ औगाष्ट २००७ पर्यंत दोन्ही बँकानी मिळून १००० रोपे लावली. ही प्रामुख्याने निलगिरी, एकेशियाव सुरू यांची रोपे होती. या उपक्रमात बँकांचे कर्मचारी,सभासद, स्थानिक रहिवासी कल्याण,ठाणे येथील ज्येश्ठ नागरीक, महिला मंडळाच्या सभासद व अनेक मान्यवरांनी मोठ्या आनंदाने सक्रीय सहभाग घेतला.

जानेवारी २००८ ते जुलै २००८: त्रिपक्षीय करार झाल्यानंतर वृक्षारोपणासाठी फारच थोडा अवधी मिळाला होता. परंतु २००८ साली पुरेसा वेळ मिळाल्यामुळे विकास आराखडा तपशीलात होऊ शकला व योग्या नियोजन झाल्यामुळे वृक्षारोपण अधिक शिस्तीने झाले. गेल्या वर्षीची झाडे रुजवणे, टिकवणे,नवीन रोपाकारीता खड्डे खानने, खाते घालून खड्डे भरणे व योग्य रोपे लावणे, पाणी देणे अशी कामांची विभागणी होती. या वेळी कल्याणातील सुप्रसिद्ध रोटरीयन व महिंद्रा लाइफ स्पेसेसचे जनरल मॅनेजर श्री. मधुसूदन देवकर यांनी ४००० वृक्ष्ंच्या लागवडीचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच कल्याण जनताचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. मोहन आघारकर यांच्या पुढाकारामुळे मुलुंड येथे जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने प्रतिवार्षी १००० याप्रमाणे २००८,२००९ व २०१० या टीन वर्षात एकूण टीन हजार वृक्ष लावणे व त्यांचे संगोपन करणे याची जबाबदारी स्वीकारली. अशा तर्ह्येने २००७ साली सुरू झालेल्या या प्रकल्पास गती मिळाली. भारत देश विविधतेबद्दल प्रसिद्ध आहे. शेकडो प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती भारतामध्ये उपलब्ध आहेत. या प्रकल्पात सुद्धा ८० हून अधिक प्रजातींचे वृक्ष लावले आहेत. या प्रकल्पात सर्वांचा सहभाग आहे. दि २३ व २४ मार्च २००८ या दोन दिवशी सुमारे २५० लोकांनी ६५० रोपे लावली. तसेच दि २२ जून ते २९ जून २००८ हा 'वनीकरण सप्ताह' म्हणून बँकेने साजरा केला. या सप्ताहात गुजराती, मारवाडी समाजातील विविध संस्था, होँगर्डस, बॅंकेचे कर्मचारी, शाळांमधील विद्यार्थी अशा अनेकांनी वृक्षारोपण केले.

दि १८ जून २००८,वटपौर्णिमा हा एक अभिनव उपक्रम झाला. कल्याणातील विविध महिला संस्थांच्या १२५ महिलांनी १०० वडान्ची लागवड केली. त्याबरोबरच १०० आवळ्याची रोपे लावली.

सन २००९, २०१० व नंतर या कालावधीत अनेक कामे झाली,
१) प्रकल्पाच्या जागेवर झाडझाडोरा खूप होता. प्रत्यक्ष निगराणी नसल्याने ही झाडे पूर्ण वाढण्यापूर्वीच लोक जळावु लाकूड म्हणून वापरत असत. या सर्व झांडांचे सर्वेक्षण करण्यात आले. ससॅग, सावर, पळस व इतर अशा चार प्रकारच्या वृक्षांमधे त्याचे वर्गीकरण करण्यात येऊन या झाडांची जोपासणी केली त्याचा तपशील खालील कोष्टकात दिला आहे.

जागासागसावरपळसइतरएकूण
कल्याण जनता२४७७१७८३०९३०९३२७३
ठाणे जनता३२७०२०९२५९६२८४४६६
एकूण५७४७३८७६६८९३७७७३९

२) प्रकल्पाची जागा बहुतांशी नदीकाठी असून डोंगरउतारावर आहे. पावसाळ्यात सर्व पाणी वाहून नदीला मिळते. हे पाणी जागेमधे जिरविण्यासाठी टीन तलाव बांधले असून यांधे ४ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.

३) यान्सन व सिल्याक या कंपनीने दि ३ ओक्टॉबर २०१० रोजी संचालक समाजसेवा पुरस्कार निधीबारोबर त्रिवार्षीय करार केला असून प्रतिवार्षी १००० वृक्ष लागवडिच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

४)नक्षत्रवन: एकूण २७ नक्षत्रे असून टी १२ राशींमधे असतात. आपल्या शास्त्रामधे एक किंवा दोन आधारवृक्ष असतो. दि २३ ऑगश्ट २०१० रोजी ३० चौ. मी. व्यासच्या एक गोलात २७ विभाग करून नक्षत्राच्या आधारवृक्षाप्रमाणे वृक्षारोपण केले. याच्या मध्यभागी एक चौथारा बांधण्यात येईल.

५) पत्रीवन: गणपतीला २१ निरनिराळ्या वनस्पती गणेश चतुर्थीला वाहतात. या वनस्पतींना गणेश पत्री असे म्हणतात. या प्रकल्पांतर्गत पत्रीवनाची योजना आहे,.

६) मसाल्याची झाडे, आयुर्वेदासाठी वनस्पती, शालेय व महाविद्यालयातील अभ्यासासाठी एक वनस्पतीशास्त्राकारीता बाग निर्माण करण्याची योजना आहे.

रोपांची लागवड केल्यानंतर सर्वच रोपे जगात नाहीत. काही रोपे वाढल्यानंतर खाली दगड लागल्यामुळे कारपून जातात अश्या न वाढलेल्या रोपान्ऐवजी दुसरी रोपे लावली जातात . आतापर्यंत लावून जगलेली रोपे खालील कोष्टकात दिलेली आहेत.

जागा२००७२००८ २००९ २०१० एकूण
कल्याण जनता५०० ३७५० १६०० १६०० ७४५०
ठाणे जनता५०० २७५० ६०० ६०० ४४५०
एकूण१००० ६५०० २२०० २२०० ११९००

२०१४ पर्यंतच्या सात वर्षातील लक्ष्य प्रत्येक हेक्टर मध्ये १०० वृक्ष

कल्याण जनता१० हेक्टर१०००० वृक्ष
ठाणे जनता१० हेक्टर १०००० वृक्ष
एकूण२० हेक्टर२०००० वृक्ष

या प्रकल्पाला अनेक पैलू आहेत. महाराष्ट्रातील कदाचित भारतातील हा एकमेवाद्वितीय असा प्रकल्प आहे. एखाद्या सहकारी बँकेने वनीकरांनचा प्रकल्प यशस्वीरित्या टीन सव्वा टीन वर्षात सुमारे १२००० वृक्ष लावून व त्यांची जोपासना करून केला ही अभूतपूर्व गोष्ट आहे.

नवीन आर्थिक धोरण अमलात आल्यावर PPP(public private partnership) चा बोलबाला झाला आहे. सहकारी बॅंक जरी रूढारथाने खाजगी संस्था नसली तरी PPP च्या संकल्पनेचे या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तंपरकारे दर्शन होते. बहुराष्ट्रीय कंपन्या व आपल्या मोठ्या खाजगी कंपन्या, CSR(Corporate Social Respnsibilty) ही संकल्पना प्रस्थापीट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिंद्रा लाइफ स्पेसेस, जॉन्सन अँड जॉन्सन, यान्सन व सिलेक या कंपन्यांनी या प्रकल्पाळा लावलेला हातभार हीच गोष्ट अधोरेखीत करीत आहे.

आणखी एक वशिष्ट्य म्हणजे अवघ्या ७५ वयाची एक मानाने युवा असलेली व्यक्ती एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की काय उभे करू शकते याचा एक वस्तूपातच हा प्रकल्प देतो.या प्रकल्पाच्या उभारणीत स्वतःला झोकून डून श्री. वा. द. साठे यांनी जे काम केले ते केवळ अतुलनीय असेच आहे. माजी वनाधिकारी श्री. अनिल ठाकरे या प्रकल्पाचे तांत्रीक सल्लागार. त्यआणनीए या प्रकल्पाकरीता ज्या आत्मीयतेने काम केले ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. आमच्या बॅंकेचे कर्मचारी श्री श्याम चव्हान व श्री भगवान गायकवाड यांचे निर्लास व निरपेक्ष काम केवळ कौतुकास्पद आहे. महिंद्रा लाइफ स्पेसेस, जॉन्सन अँड जॉन्सन, यान्सन व सिलेक, वानखात्यातील अधिकारी, सेवक, बॅंकेचे कर्मचारी,अधिकारी कल्याणातील विविध सामाजिक संस्था, बॅंकेचे हिटचींतक, टिटवाळा, रुण्दे,म्हसकल गावातील ग्रामास्त यांचेही योगदान लक्षणीय आहे.

ज्यांचा उल्लेख खर म्हणजे प्रथम होणे आवश्यक आहे त्या 'कृपा धाम' आश्रमातील सर्व मंडळींच्या सहकर्‍याच्या आधारावरच वनीकरण प्रकल्प चालविला आहे.या सर्व हिटचिंताकंच्या प्रेमामुळेच श्री. शंकर महाराजांच्या आशीर्वादामुळेच सहकारातून वनीकरण प्रकल्प यशस्वी होत आहे.

या प्रकल्पात सर्वात मोठा आणि महत्वाचा पैलू म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. केवळ नागरी भागातच नव्हे तर ग्रामें भागात सुद्धा प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हवेतील ओक्सीजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डाय ओक्साईड चे प्रमाण वाढत आहे. विकासाच्या चुकीच्या कल्पनांनी पृथ्वीचे दोहन न होता पिळवणूक होत आहे. परिणामात: पृथ्वीचे तापमान वाढत आहे. निसर्गाचे चक्र बदलले आहे. लाडाखला झालेली ढगफूटी व त्यातून झालेले प्रचंड नुकसान आपल्याला इशारा देत आहे. निसर्गावर मॅॅट करून त्याला जिंकून व त्याला गुलाम करून मानवी विकास करण्याच्या विकृतीपासून मानव जितक्या लवकर डोर जाईल तितके त्याच्या हिताचे होईल ही वस्तुस्थिती आहे. निसर्गाबरोबर, त्याला समजून घेऊन त्याच्या अंतर्गत विकास करन्यानेच मानवाचे भले होणार आहे हे निश्चित.

पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जाणीव लोनकामधे निर्माण करण्याचे व त्या दिशेने एक पाऊल टाकण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न हा प्रकल्प करीत आहे. या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन महिंद्रा लाइफ स्पेसेस ने वानखात्याकडून जमीन भाडे कराराराने घेऊन एक लक्ष वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! कोकण नागरी बॅंक्स असोसिएशनच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बॅंक आपणास अशा तर्हेच्या प्रकल्प हाती घेण्याचे आवाहन करीत आहे.

व.द.काणे
संचालक
दि कल्याण जनता सहकारी बॅंक लि.

आपल्याला हे ही वाचायला आवडेल...


एस. एम. एस. सुविधा
09223051595

आपल्या खात्यातील बाकी जाणण्यास SBAL असा एस.एम.एस. 09223051595 या क्रमांकावर करा.

इतक्यातील ३ व्यवहार जाणण्यास LST3 असा एस.एम.एस. करा.

आम्हाला इमेल करा

ए.टी.एम. चे पत्ते
शाखांचे पत्ते
धनादेश जमायंत्र
विविध फॉर्म
सूचना / अडचणी
निविदा सूचना
कॅल्क्युलेटर
वार्षिक अहवाल
वार्षिक सुट्ट्या
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
५ फेब्रुवारी (ईद ए मिलाद)
१९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती)
२० फेब्रुवारी (महाशिवरात्री)
८ मार्च (होळी)
२३ मार्च (गुढी पाडवा)
१ एप्रिल (रामनवमी)
२ एप्रिल
५ एप्रिल (महावीर जयंती)
६ एप्रिल (गुड फ्रायडे)
१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)
१ मे (महाराष्ट्र दिन)
६ मे (बुद्ध पौर्णिमा)
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन)
१८ ऑगस्ट (पारसी नववर्ष शहेन्शाही)
२० ऑगस्ट (रमजान ईद)
१९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
२९ सप्टेंबर
२ ऑक्टोबर (गांधी जयंती)
२४ ऑक्टोबर (दसरा)
२६ ऑक्टोबर (बकरी ईद ईद उझ झुआ)
१३ नोव्हेंबर (दिवाळी लक्ष्मीपूजन)
१४ नोव्हेंबर (दिवाळी भाऊबीज)
२५ नोव्हेंबर (मोहरम)
२८ नोव्हेंबर (गुरु नानक जयंती)
२५ डिसेंबर (ख्रिसमस)
महत्वाच्या वेबसाईट लिंक्स