मुख्पृस्थाकडे

सभासदांसाठी कल्याणकारी योजना

सभासदांच्या कल्याणकारी योजनांसाठी, बँक, प्रत्येक वर्षीच्या नफ्यामधून, काही विशिष्ट भाग, वेगळा राखून ठेवत आली आहे. सभासदांच्या गरजा भागवण्यासाठी, दर वर्षी या योजनांचे पुर्विलोकन केले जाते. सभासदांचे कल्याण हा बँकेचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. सभासदांच्या फायद्यासाठी बँकेने निरनिराळ्या योजना सुरु केल्या आहेत. सध्याच्या लागू असलेल्या योजनांचे तपशील आणि अटी खालीलप्रमाणे आहेत.. सभासदांनी, नवीन आणि सुधारित योजना जाणून घेण्यासाठी, बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या, शेअर विभागाशी संपर्क करावा. खालील तपशील ३१ जुलै २००९ पर्यंत चे आहेत.

वैद्यकीय कल्याण योजना

पात्रता

या योजनेसंदर्भातील सर्वसाधारण अटी खालीलप्रमाणे आहेत. या योजनांमध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनाकडे आहेत आणि एका आठवड्याच्या पूर्वसूचनेने हे सभासदांना कळवले जाईल.

  1. सभासदाने बँकेच्या सदस्यत्वाची कमीत कमी २ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  2. सभासद खालीलपैकी कोणत्याही वैद्यकीय तपासणीसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी, त्याच्या सभासदत्वाच्या संपूर्ण कार्यकालात केवळ एकदाच अर्ज करू शकतो.
  3. संयुक्त सभासदत्वाच्या बाबत, योजनेचा लाभ, ज्या सभासदाचे नाव बँकेच्या शेअर होल्डर नोंद वहीमध्ये प्रथम नोंदले गेले असेल, त्यालाच मिळू शकतो.
  4. सभासदाने वैद्यकीय तपासणी किंवा शस्त्रक्रियेच्या २ वर्षांमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

टीप: नाममात्र सभासदांना ही योजना लागू होणार नाही.

वैद्यकीय तपासणी किंवा शल्यक्रियेसाठी आर्थिक सहाय्य

  1. बायपास शस्त्रक्रिया : रु. १०,०००/-
  2. अन्जिओ प्लास्टी : रु. ८०००/-
  3. अन्जिओग्राफी : रु. ८०००/-
  4. मोतीबिंदू : रु. २०००/-
  5. मेंदूची शस्त्रक्रिया : रु. १०,०००/-
  6. किडनी प्रत्यारोपण : रु. १०,०००/-
  7. कर्करोगाचे निदान : रु. : ५०००/-
  8. स्कानिंग : रु. ५००/-
  9. एम. आर. आई. : रु. १०००/-

शारीरिक अपंगत्वासाठी आर्थिक सहाय्य

अपघात अथवा वैद्यकीय कारणांमुळे, शारीरिक अपंगत्व आले असल्यास, बँक सभासदांना रु. ५०००/- चे अर्थ सहाय्य करते. सभासदांनी “all india institute of physical medicine and rehabilitation” अथवा कोणत्याही सरकारी इस्पितळातून ४०% अपंगत्वाचे सर्टीफिकेट अर्जासोबत जोडावे.

वयस्कर नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर

  1. बँकेचे सभासद, २ वर्षातून एकदा, मोफत वैद्यकीय तपासणी करून घेऊ शकतात. ही सुविधा कल्याणातील ६ रुग्णालयांत उपलब्ध आहे.
  2. वयाची पात्रता : पुरुष सभासदाने, वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  3. स्त्री सभासदासाठी अशी कोणतीही वयोमर्यादा नाही.
  4. योजने अंतर्गत खालील तपासण्या केल्या जातात :
    1. ब्लड – सी.बी.सी., एच.बी.
    2. ब्लड शुगर (रँडम)
    3. युरीन रुटीन
    4. ई.सी.जी.
    5. फिजिशियन कडून तपासणी, स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी
  5. रुग्णालयांची यादी :
    1. डॉ. तेलवणे यांचे "साई प्रसाद हॉस्पिटल", आग्रा रोड, कल्याण (प).
      दूरध्वनी : ०२५१ - २२०८२४० / ०२५१ - २२११२१७
    2. "श्री देवी हॉस्पिटल", भानू सागर सिनेमा गृहाजवळ, स्टेशन रोड, कल्याण (प).
      दूरध्वनी : ०२५१ - २३१६४२८
    3. डॉ. संजय गोडबोले यांचे "श्री हॉस्पिटल", मुरबाड रोड, कल्याण (प).
      दूरध्वनी : ०२५१ - २२००५२९ / ०२५१ - २२०९९२६
    4. डॉ. परळीकर यांचे "अजित स्कांनिंग" सेंटर, कर्णिक रोड, कल्याण (प).
      दूरध्वनी : ०२५१ - २२१३६३५ / ०२५१ - २२१३५३१
    5. डॉ. सुनील उमर्डेकर यांचे "गुरुकृपा हॉस्पिटल", बिर्ला कॉलेज रोड, शिवधाम अपार्टमेंट, कल्याण (प).
      दूरध्वनी : ०२५१ - ३२४०४९० / ०२५१ - ५६०८१९१
    6. डॉ. खटले यांचे "साई कृपा हॉस्पिटल", योगेश्वर टॉवर, पुणे लिंक रोड, काटेमानिवली, कल्याण (पू).
      दूरध्वनी : ०२५१ - २३३५४३१

वारसदार सभासदासाठी आर्थिक सहाय्य

सभासदाच्या नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यूनंतर, बँक सभासदाच्या वारसाला आर्थिक सहाय्य देऊ करते.

पात्रता

  • वारसा हक्कासाठी अर्ज करणारी व्यक्ती, बँकेच्या नोंदींनुसार, वारसदार असावी.
  • सभासदाच्या मृत्यूनंतर २ वर्षांच्या आत वारसा हक्कासाठी अर्ज करण्यात यावा.
  • वारसदाराने बँकेला स्वताच्या अस्तित्वाचा खात्रीलायक पुरावा सादर करावा.

विद्यार्थी प्राविण्य पुरस्कार

बँक गुणवंत सभासद अथवा सभासदांच्या गुणवंत मुलांचा विद्यार्थी प्राविण्य पुरस्कार देऊन सत्कार करते.

पात्रता

  • अर्जदाराने पुरस्कार जाहीर / वितरित केला जाण्यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षात, परीक्षा दिलेली असावी.
  • पुरस्कार जाहीर / वितरित केला जाण्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या अंतिम दिवसापर्यंत अर्जदार अथवा त्याची माता अथवा त्याचे वडील बँकेचे सभासद असावेत.

पुरस्कारासाठी निकष :

  • १२ वी विज्ञान : खुल्या विभागासाठी ७५% आणि अधिक, राखीव विभागासाठी ७०% आणि अधिक
  • १२ वी कला आणि वाणिज्य : ७०% आणि अधिक
  • १० वी : अराखीव विभागासाठी ७५% आणि अधिक, राखीव विभागासाठी ७०% आणि अधिक
  • ४ थी आणि ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा : शिष्यवृत्ती मिळालेली असावी
  • राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेसाठी शिष्यवृत्ती (१० वी) : शिष्यवृत्ती मिळालेली असावी
  • गंधर्व महाविद्यालय अथवा national school of drama ने घेतलेल्या अंतिम परीक्षेमध्ये नृत्य, संगीत अथवा नाटक विभागात distinction

एस. एम. एस. सुविधा
09223051595

आपल्या खात्यातील बाकी जाणण्यास SBAL असा एस.एम.एस. 09223051595 या क्रमांकावर करा.

इतक्यातील ३ व्यवहार जाणण्यास LST3 असा एस.एम.एस. करा.

आम्हाला इमेल करा

ए.टी.एम. चे पत्ते
शाखांचे पत्ते
धनादेश जमायंत्र
विविध फॉर्म
सूचना / अडचणी
निविदा सूचना
कॅल्क्युलेटर
वार्षिक अहवाल
वार्षिक सुट्ट्या
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
५ फेब्रुवारी (ईद ए मिलाद)
१९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती)
२० फेब्रुवारी (महाशिवरात्री)
८ मार्च (होळी)
२३ मार्च (गुढी पाडवा)
१ एप्रिल (रामनवमी)
२ एप्रिल
५ एप्रिल (महावीर जयंती)
६ एप्रिल (गुड फ्रायडे)
१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)
१ मे (महाराष्ट्र दिन)
६ मे (बुद्ध पौर्णिमा)
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन)
१८ ऑगस्ट (पारसी नववर्ष शहेन्शाही)
२० ऑगस्ट (रमजान ईद)
१९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
२९ सप्टेंबर
२ ऑक्टोबर (गांधी जयंती)
२४ ऑक्टोबर (दसरा)
२६ ऑक्टोबर (बकरी ईद ईद उझ झुआ)
१३ नोव्हेंबर (दिवाळी लक्ष्मीपूजन)
१४ नोव्हेंबर (दिवाळी भाऊबीज)
२५ नोव्हेंबर (मोहरम)
२८ नोव्हेंबर (गुरु नानक जयंती)
२५ डिसेंबर (ख्रिसमस)
महत्वाच्या वेबसाईट लिंक्स