जे ईमेल ने पोस्ट कार्डाच्या बाबतीत केले ते आर.टी.जी.एस. आणि एन.ई.एफ.टी. द्वारे पैश्याच्या स्वरूपातील रक्कम हस्तांतरित करण्यात अभिप्रेत आहे. बँका आता, धनादेशाच्या ऐवजी रक्कम हस्तांतरित करण्यासाठी आर.टी.जी.एस. अथवा एन.ई.एफ.टी. द्वारे आर.बी.आई. च्या गेटवेवर केवळ संदेशांच्याद्वारे पैशाच्या स्वरूपातील रकमा हस्तांतरित करू शकतात.
इलेक्ट्रोनिक संदेश अतिशय वेगात पोहोचवला जात असल्याने, व्यवहार लगेचच पूर्ण केला जातो. धनादेशांच्या पद्धतीमध्ये हे शक्य नसते. आर.टी.जी.एस. अथवा एन.ई.एफ.टी. मध्ये दात्याने आपल्या बँकेला आपल्या खात्यामधून रक्कम काढून घेण्याबद्दल आणि लाभार्थीच्या खात्यामध्ये तेवढीच रक्कम भरण्याबद्दल सूचित करायचे असते. आर.टी.जी.एस. अथवा एन.ई.एफ.टी. मध्ये व्यवहार अतिशय वेगात पूर्ण केला जातो. हस्तांतरणाची सूचना दिल्यापासून, आर.टी.जी.एस. च्या बाबतीत जास्तीत जास्त २ तासांत व्यवहार पूर्ण होतो.
आर.टी.जी.एस. आणि एन.ई.एफ.टी. या आर.बी.आई. च्या इलेक्ट्रोनिक पेमेंट प्रक्रिया आहेत. यांमध्ये भाग घेणाऱ्या बँकांमध्ये दिवसभर ऑलाईन व्यवहार होत असतात. आर.टी.जी.एस. आणि एन.ई.एफ.टी. द्वारे एका बँकेचे ग्राहक, लाभार्थी च्या इतर एखाद्या बँकेतील खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करू शकतात. आर.टी.जी.एस. आणि एन.ई.एफ.टी. द्वारे विविध बँकांमध्ये आणि त्यांच्या अनेकविध शाखांमध्ये व्यवहार होऊ शकतात. सध्या ९५ बँका आणि जवळजवळ ५६,००० शाखा या प्रक्रियेत सहभागी आहेत.
आर.टी.जी.एस. अथवा एन.ई.एफ.टी. द्वारे पैसे पाठवण्यासाठी फक्त अर्ज भरणे आणि सही करणे एवढेच आवश्यक असते. या अर्जात लाभार्थी चे नाव, बँकेचे नाव आणि शाखा, खाते क्रमांक आणि खाते प्रकार, लाभार्थी बँकेचा आई.एफ.एस.सी. कोड यांचा समावेश असतो. हा अर्ज बँकेच्या शाखांमध्ये आणि वेबसाईट वर उपलब्ध आहे.
इतर समाशोधन पद्धतींच्या तुलनेत, या प्रक्रियेचे वैशिष्ट्य असे की, पैसे त्वरीत पाठवता अथवा स्वीकारता येतात. स्वाक्षरी असलेल्या अर्जाच्या स्वरुपात सूचना मिळाल्यानंतर, आम्ही रक्कम आर.टी.जी.एस. अथवा एन.ई.एफ.टी. द्वारे लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पाठवतो.
आपल्या खात्यातील बाकी जाणण्यास SBAL असा एस.एम.एस. 09223051595 या क्रमांकावर करा.
इतक्यातील ३ व्यवहार जाणण्यास LST3 असा एस.एम.एस. करा.
Disclaimer: This website has been designed by the bank with copyrights. By accessing this website you acknowledge that you are seeking information on your own accord. While every attempt is made to ensure that the contents are updated, however, no legal action can be initiated against the bank or any of its officers/staff directly/indirectly for any reason on the contents/display of the website. The visitors are advised to contact the nearest branch for getting updated and accurate information about any product or service of the Bank. The terms and conditions for various products and data and content displayed are subject to change without any prior notice. Terms and conditions are applicable to each of the product on display. This website is for information purpose only.
Obviously best viewed in Mozilla Firefox and in screen resolution 1024 X 768 and above.

