मुख्पृस्थाकडे

बचत खाते

ग्राहकांना बचतीची सवय व्हावी यासाठी बचत खाते उघडणे हा सर्वात सोपा पर्याय आहे की ज्यामुळे वेळेला पैशांची गरजही पूर्ण होते शिवाय शिल्लक रकमेवर व्याज मिळते.

बचत खाते वैयक्तिक अथवा संयुक्त नवे उघडता येते. १४ वर्षांवरील व्यक्ती, अज्ञान मुलांच्या नावे त्यांचे नैसर्गिक अथवा कायदेशीर पालक बचत खाते उघडू शकतात. अशिक्षित व्यक्ती, अंध व्यक्ती व HUF यांनाही बचत खाते उघडता येते.

बचत खाते उघडण्यासाठी प्रथम रु. ५००/- भरावे लागतात. तसेच खात्यावर कायम कमीत कमी र. ५००/- शिल्लक असणे आवश्यक आहे. ज्या खातेदारांना चेक बुक ची सुविधा दिली असेल त्यांच्या खात्यावर कमीत कमी शिल्लक र. १०००/- इतकी असावी लागते.

बचत खात्यावर रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या निर्देशानुसार दर सहा महिन्यांनी ३.५% दराने व्याज दिले जाते. दर वर्षी सहा महिन्यांनी म्हणजे मार्च व सप्टेंबर महिन्यात बचत खात्यात व्याज जमा केले जाते.

बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर TDS कपात होत नाही. तसेच बचत खात्यावर, जास्ती जास्त किती रक्कम शिल्लक ठेवावी यावर कसलेही बंधन नाही.

खात्यावरील व्यवहार withdrawal slips किंवा चेक यांपैकी कशानेही करता येतो. एका वर्षात १०० withdrawal slips किंवा ४ चेकबुक्स (१ चेकबुक मध्ये १० चेक असतात) विनाशुल्क वापरता येतात.

बचत खात्यावर Standing Instruction(SI) ची सेवा उपलब्ध असते. आवर्ती ठेव (Recurring Deposit), कर्जाचा मासिक हप्ता अशा व्यवहाराकरिता SI ची सेवा निशुल्क उपलब्ध आहे.

स्थानिक व परगावचे धनादेश तसेच लाभांश व व्याजाचे धनादेश वाताविण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे.

बचतखाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे

बचत खाते उघडण्यापूर्वी पुढील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • खाते उघडण्यासाठी लागणारा फॉर्म योग्य रीतीने भरलेला असावा.
  • राहत्या घराच्या पत्त्याचा पुरावा
  • PAN कार्डाची फोटोप्रत
  • २ फोटो
  • बँकेतील खातेदाराची ओळख

अन्य सुविधा

  • बचत खात्यावर नामांकन सुविधा उपलब्ध आहे.
  • जे खातेदार बँकेच्या नियमाप्रमाणे खात्यावर शिल्लक ठेवतात त्यांना कोणत्याही प्रकारच्या चार्जेस शिवाय ATM सुविधा उपलब्ध आहे. (बँकेच्या ATM मधून दर दिवशी र. १५,०००/- पर्यंत रक्कम काढता येते.)
  • बँकेच्या सर्व शाखांमध्ये बचत खाते व मुदत ठेवींवरील व्यवहारासाठी Any Branch Banking ही सुविधा उपलब्ध आहे.
  • CDM मशीन द्वारे धनादेश भरण्याची सुविधा ग्राहकांसाठी अहोरात्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात पोचपावती पण देण्याची सोय आहे.

आपल्याला हे ही वाचायला आवडेल...


एस. एम. एस. सुविधा
09223051595

आपल्या खात्यातील बाकी जाणण्यास SBAL असा एस.एम.एस. 09223051595 या क्रमांकावर करा.

इतक्यातील ३ व्यवहार जाणण्यास LST3 असा एस.एम.एस. करा.

आम्हाला इमेल करा

ए.टी.एम. चे पत्ते
शाखांचे पत्ते
धनादेश जमायंत्र
विविध फॉर्म
सूचना / अडचणी
निविदा सूचना
कॅल्क्युलेटर
वार्षिक अहवाल
वार्षिक सुट्ट्या
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
५ फेब्रुवारी (ईद ए मिलाद)
१९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती)
२० फेब्रुवारी (महाशिवरात्री)
८ मार्च (होळी)
२३ मार्च (गुढी पाडवा)
१ एप्रिल (रामनवमी)
२ एप्रिल
५ एप्रिल (महावीर जयंती)
६ एप्रिल (गुड फ्रायडे)
१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)
१ मे (महाराष्ट्र दिन)
६ मे (बुद्ध पौर्णिमा)
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन)
१८ ऑगस्ट (पारसी नववर्ष शहेन्शाही)
२० ऑगस्ट (रमजान ईद)
१९ सप्टेंबर (गणेश चतुर्थी)
२९ सप्टेंबर
२ ऑक्टोबर (गांधी जयंती)
२४ ऑक्टोबर (दसरा)
२६ ऑक्टोबर (बकरी ईद ईद उझ झुआ)
१३ नोव्हेंबर (दिवाळी लक्ष्मीपूजन)
१४ नोव्हेंबर (दिवाळी भाऊबीज)
२५ नोव्हेंबर (मोहरम)
२८ नोव्हेंबर (गुरु नानक जयंती)
२५ डिसेंबर (ख्रिसमस)
महत्वाच्या वेबसाईट लिंक्स